Kolhapur| केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण, नाट्यगृहाचं सौंदर्य कायम ठेवलं- CM Devendra Fadnavis

दोन वर्षांपूर्वी आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झालेलं कोल्हापूरचं ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आता नव्या दिमाखात पुनरागमनासाठी सज्ज झालं आहे. अत्याधुनिक लाईट, साऊंड, वातानुकूलन व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज झालेल्या या नाट्यगृहाच्या तांत्रिक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. लोकार्पणापूर्वी सर्व व्यवस्था ‘ओके’ असल्याचा ग्रीन सिग्नल मिळाल्याने कलाकार आणि रसिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित व्हिडीओ