धाराशिवमध्ये कोळी समाजाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची गाडी अडवत घोषणाबाजी केली. सुलभतेने जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी समाज आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेट आणि निजामकालीन संशोधन ग्रंथांच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. जात पडताळणी समितीत मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.