अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमधील बिबट्या आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची धुमश्चक्री चार तासानंतर थांबलीय. संध्याकाळी सहाच्या सुमारास बिबट्या या परिसरात घुसला होता. वनविभाग, पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं. बिबट्या सतत रेस्क्यू ऑपरेशन टीमला गुंगारा देत होता. बिबट्या अनेकवेळा सापळ्यासमोर आला मात्र त्याला पकडण्यात यश येत नव्हतं. याचवेळी कर्मचाऱ्यांसमोर अंधार पडण्यापूर्वी बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान होतं.अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या वनविभागाच्या सापळ्यात अडकला..