बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लुकआउट नोटीस जारी केली आहे. 'बेस्ट डील टीव्ही' या त्यांच्या बंद पडलेल्या कंपनीच्या व्यवहारातून एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.