भारतीय हवामान विभागाने 2026 च्या मोसमी पावसाबाबत चिंताजनक अंदाज जाहीर केला आहे. यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस पडण्याचा अंदाज असून हे सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडते. तीन वर्षांत प्रथमच असा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेती, जलाशय पातळी आणि ग्रामीण मागणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय. दरम्यान हवामान विभाग पावसाचा दुसरा अंदाज मे महिन्यात जाहीर करणार आहे.