विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत, याचसाठी आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे.शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या १७ जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागलंय. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, तसंच पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, आणि अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या कोट्यातून विधान परिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे ठाणे, कोकण, परभणी-हिंगोली, सातारा-सांगली या ठिकाणाहून महायुतीतून उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता आहे.