कळंब येथील मनीषा बिडवे हत्याप्रकरणी दोन्ही आरोपींना आज धाराशिवच्या कळंब न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मनीषा बिडवे यांचा मृतदेह कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत आढळून आला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांचा वापर स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात करण्यात येणार होता. असा दावा केल्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी दोघा जणांना अटक करून गुन्हा देखील दाखल केला. या अनुषंगाने न्यायालयाकडून आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.