मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेतून नेमकी काय मागणी केली आहे कोण कोणते कागदपत्रे जोडले आहेत या संदर्भात त्यांच्यासोबत सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी...