पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 'आमच्या विचारांचे' सदस्य निवडून दिले नाहीत, तर विकासाचे दरवाजे बंद होतील, असा थेट इशारा राणेंनी दिला. 'निधीचे दरवाजे कसे बंद करायचे, हे आम्हाला माहीत आहे', असेही ते म्हणाले. सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ.