शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचं असेल तर एक उत्तम पर्याय म्हणजे कर्जमाफी.सरकारमधले किंवा विरोधी पक्षातले जेवढे नेते शेतकऱ्याच्या बांधावर गेले, त्या सगळ्यांना शेतकऱ्यांनी एकच प्रश्न विचारला. तो म्हणजे कर्जमाफी कधी देता.कदाचित या प्रश्नाच्या उत्तरासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले... पंतप्रधान मोदींनाही भेटले.कर्जमाफी कधी होणार, या प्रश्नावर दिल्लीतून फडणवीस म्हणाले. कर्जमाफी तो करेंगे, पर तारीख बताएँगे.त्यामुळे कर्जमाफी तर होणार पण त्याची वेळ राजकीय टायमिंगनुसार ठरणार की काय असा प्रश्न आहे.