Reservation| अनुसूचित जातींचं होणार उपवर्गीकरण, महाराष्ट्रातली स्थिती काय? NDTV मराठीचं विश्लेषण

एकिकडे आरक्षणावरून राज्यात उभा संघर्ष पेटलेला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जातींच्या म्हणजेच SC प्रवर्गाच्या आरक्षणाच्या सूत्रामध्ये बदल करण्याचे संकेत दिलेत. अनुसूचित जातींना सुद्धा क्रीमी लेअर फॉर्म्युला लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती फडणवीसांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिलीय. तसंच अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी हायकोर्टाच्या माजी न्याय‍धीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल, असं फडणवीस म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ