Beed: वन्यजीव कायद्यांतर्गत अटक असलेल्या 'खोक्या' भोसलेला जामीन मंजूर | Khokya Bhosle | NDTV मराठी

सतीश भोसले याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा मारला असता, त्यांना वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य, वन्यप्राण्यांचे मांस आणि गांजा आढळला होता. आरोपीच्या वकिलांनी, ॲडव्होकेट राजन धसे, यांनी न्यायालयात बाजू मांडली. या युक्तिवादानंतर शिरूर-कासार न्यायालयाने सतीश भोसलेचा जामीन अर्ज मंजूर केला.

संबंधित व्हिडीओ