Pahalgam Terror Attack| पहलगाम हल्ल्यासंदर्भातले धक्कादायक अपडेट्स NDTV मराठीच्या हाती

पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट हाती येतेय. हल्ल्यावेळी दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये मिसळून गर्दीला जाणूनबुजून इतर दोन सशस्त्र हल्लेखोरांकडे हाकलले, यामुळे गर्दी पांगणार नाही आणि टप्प्याटप्प्याने हल्ला करता येईल.हा त्यामागचा उद्देश होता.अशी माहिती सूत्रांनी दिलीय.तर दुसरीकडे हल्ल्यात स्थानिकांच्या मदतीची शक्यताही वर्तवण्यात येतेय.. दोन स्थानिक तरुण, जे पूर्वी पाकिस्तानात गेले होते.त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.बैसारनसारख्या दुर्गम भागात स्थानिक मदतीशिवाय अशा प्रकारचा हल्ला करणे शक्य नसल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर ते स्थानिक जंगलात पळून गेल्याचं समजतंय...

संबंधित व्हिडीओ