परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीने आता आक्रमक वळण घेतलंय. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, तसेच 5 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले विनोद आडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते. शासनाने आरक्षणाच्या मागणीची तातडीने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. याआधी 12 सप्टेंबर रोजी रास्ता रोको, तर 16 सप्टेंबर रोजी जिंतूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येलदरी जलाशय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.