उपवर्गीकरणाविरोधात 3 ऑक्टोबरला Nashik मध्ये मोर्चा, माजी मंत्री बबनराव घोलप यांची सरकारवर टीका

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपवर्गीकरणाला विरोध करत 3 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्यभर दौरे सुरू असून विविध ठिकाणी जनजागृती केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. इम्पिरिकल डेटा उपलब्ध नसताना उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी घोलप यांनी केली. तसेच सरकारने बद्री समितीचा अहवाल अद्याप का जाहीर केलेला नाही, असा सवाल उपस्थित करत पारदर्शकतेची मागणीही त्यांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ