नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून 43 वर्षीय औदुंबर मनोहर गडदे या भोंदूने 42 वर्षी महिलेवर अत्याचार करुन 50 लाखांना लुटलंय..याप्रकरणी भोंदूबाबा विरोधात स्वागरगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.आरोपी औदुंबर मनोहर गडदे याचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय.