Ratnagiri | Rajapur | मीठगवाणेमध्ये टेम्पोचा अपघात, बसला ओव्हरटेक करताना टेम्पो उलटला; 7 महिला जखमी

रत्नागिरीच्या राजापूरमध्ये सागरी महामार्गावर मीठगवाणे येथे टेम्पोचा भीषण अपघात.. यात अपघातात सात महिला गंभीर जखमी तर एकीचा मृत्यू झालाय. हा टेम्पो वाघ्रण येथून महिलांना घेऊन जात होता. दरम्यान लक्झरी बसला ओव्हरटेक करताना टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटला.. त्यानंतर रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला आणि 100 ते 150 फूट फरफटत गेला.. दरम्यान, जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ