ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज संध्याकाळी सहा वाजता प्रकाशन करण्यात येईल. जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडेल. या पुस्तकात रावतांनी अनेक खळबळजनक दावे केलेत. पत्राचा प्रकरणात संजय राऊत जेव्हा शंभर दिवसांसाठी तुरुंगात होते त्यावेळेला रावतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं.