शिवजयंती निमित्त अमरावतीच्या सायन्स कोर मैदानातून भव्य अशी रॅली काढण्यात आली आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी देखील यात सहभागी झाले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.