नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीतला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्याची चिन्हं दिसतायत.. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीतही जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. गेल्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे होती त्यामुळे शिवसेना पुन्हा त्याच जागेवर दावा करतेय... तर जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या आपल्या बाजूला असल्याने भाजपही ही जागा सोडायला तयार नाही... पाहुया कसा वाढलाय हा तिढा.