मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणण्यात येणार आहे. त्याला आज दिल्लीतील एनआयए मुख्यालयात आणलं जाणार आहे.एनआयएचं पथकं त्याला घेऊन अमेरिकेतून दिल्लीच्या दिशेने रवाना झालंय.तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाची जबाबदारी एनआयएकडे देण्यात आलीय.. एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी करण्यात येणार आहे.राणाच्या आजूबाजूला SWAT कमांडोंची सुरक्षा आहे.दिल्ली विमानतळावरुन बुलेट प्रूफ गाडीमधून राणाला एनआयए मुख्यालयात आणलं जाईल. राणाची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. दरम्यान भारतात आल्यानंतर सुरूवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत राहणार असल्याची शक्यता आहे.