अमेरिकन काँग्रेस म्हणजे अमेरिकेच्या संसदेतील सहा खासदारांनी अदाणी समुहाविरोधातल्या कारवाईच्या चौकशीची मागणी केलीय. युएस अॅटर्नी जनरल यांना पत्र लिहून या सहा खासदारांनी ही मागणी केलीय. जो बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेच्या विधी विभागाने अदाणी समुहावर'फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट'चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता. मात्र अदाणी समुहाने हे सर्व आरोप फेटाळले होते.अदाणी समुहाविरोधातली कारवाई भारत- अमेरिका संबंधांमध्ये अडथळा आणून हे संबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते असा दावा या खासदारांनी केलाय. लान्स गुडेन, पॅट फॉलन, माईक हॅरिडोपोलोस, ब्रॅन्डन गील, विल्यम टिमॉन्स, आणि ब्रायन बॉबीन अशी या सहा खासदारांची नावं आहेत.हे प्रकरण भारताच्या संबंधित तपास यंत्रणांकडे सोपवण्याऐवजी बायडेन प्रशासनाने त्यावर स्वत:च कारवाई करण्याचा निर्णय चुकीचा होता, असं या खासदारांनी आपल्या पत्रात म्हटलंय.