भारतात 15 जुलै रौजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली.. देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना मिळालाय.सरनाईकांनी पहिल्याच फटक्यात पूर्ण पैसे भरुन टेस्ला वाय कार विकत घेतलीय. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे,कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.