वाशिम शहराला दररोज 70 हजार ते 75000हजार लिटर डिझेल विक्री होते. मात्र काल वाशिम शहरात दोन लाख लिटर डिझेलची विक्री होऊही डिझेलचा काही वेळातच साठा संपला होता. ही परिस्थिती मागील दोन ते तीन दिवसापासून अशीच राहत आहे,ही परिस्थिती कॅन मध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्यामुळे झाली असल्याचा आरोप पेट्रोल पंप असोसिएशन कडून करण्यात आला आहे. यावर पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल आहे. वाशिम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम आहे...डिझेल अभावी शेत मशागतीची कामं ठप्प झाली असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे....या संदर्भात शेतकऱ्यांची संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी....