पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसह त्यांच्या अनेक आकांचा खात्मा केला त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं त्या रात्री अचानक ड्रोन हल्ले केले मात्र भारतानं हे सर्व हल्ले हाणून पाडले यावेळेला पाकिस्तानी सैन्यानं सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर देत नियंत्रण रेषेवरील अनेक लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या याबाबत भारतीय लष्करानं ट्विट करत माहिती दिली आहे