बीड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे हाहाकार पाहायला मिळतोय, अनेक गावांमध्ये अजूनही पुराचं पाणी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेवराईत तालुक्यातील पिंपळगाव येथे बारा ते तेरा लोक गेल्या दोन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहे. त्यांना काढण्यासाठी आज ndrf चं पथक देखील बोलवण्यात आलं. , मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने ndrf ला देखील या लोकांना सुरक्षित बाहेर काढता आलं नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टर मागवलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची आणि पूर परिस्थितीची नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी