देशावर सध्या मोठं आर्थिक संकट ओढावलंय. त्यामुळे सर्व आजी माजी आमदारांचं मानधन वर्षभरासाठी गोठवा अशी मागणी माजी आमदार सुबोध सावजींनी केलीय. सुबोध सावजींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. यात त्यांनी आजी माजी राष्ट्रपतींचं मानधन गोठवण्याचीही मागणी केलीय. सुबोध सावजींनी स्वत:चं मानधनही वर्षभरासाठी थांबवण्याची तयारी केलीय. त्यामुळे आता सुबोध सावजींच्या आवाहनानंतर राज्यातले आजी आणि माजी आमदार आपलं मानधन तसंच पेन्शन थांबवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान सावजी यांच्या विधानावर अंबादास दानवे आणि उदय सामंत काय म्हणालेत पाहुयात..