तुम्ही अलिबागला रो-रो किंवा फेरीबोटीने जात असाल तर तुमचं बजेट बिघडणार आहे. कारण जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढल्यामुळे मुंबई ते मांडवा रो-रो सेवा महाग होण्याची शक्यता आहे. तसंच पारंपरिक लाकडी फेरीबोटी चालवणाऱ्या कंपन्यांचंही आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे सेवा सुरू ठेवण्यासाठी फेरीबोटींची भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे संकेत मिळतायत. मुंबईतील विविध बंदरांवरून 150 हून अधिक नोंदणीकृत फेरीबोटी कार्यरत आहेत. भाऊच्या धक्क्यावरुन M2M रो-रो तसंच दीडशेहून अधिक बोटी रेवस, उरण, मोरा, एलिफंटा आणि मांडवा मार्गावर धावतात.