नागपूरजवळच्या खापरखेडा गावात एका अकरा वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाच्या वडिलांना शेत विकून पैसे मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी खंडणीसाठी हे कृत्य केले. मात्र, पैसे मिळण्याआधीच त्यांनी मुलाला संपवले. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.