पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल जैश-ए-मोहम्मदच्या फिल्ड कमांडरनेच कबुली दिली आहे. पाकिस्तानमध्ये दिलेल्या या कबुलीनाम्यात भारताच्या क्षेपणास्त्रांनी बहावलपुरमध्ये कसा हाहाःकार माजवला, हे त्याने स्पष्ट केले. यातून जैश आणि इतर जिहादी संघटनांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लष्कराचे साटेलोटे असल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.