मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव उपेंद्र पावसकर असून, तो ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पुतळ्यावर रंग फेकण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे पोलीस तपास करत आहेत.