आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसेसोबत युतीसंदर्भात चर्चा सुरू असून, सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका न करता फक्त ठाकरेंवरच टीका का केली जाते, हे समजून घेण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीला १०० दिवस उरले असून, विरोधकांना गाडण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.