मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला पालघरजवळच्या केळवे रेल्वे स्थानकाजवळ अचानक आग लागली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. सध्या आग विझवण्यात आली असून, रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे.