ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) झालेल्या अटकेमुळे ठाणे अतिक्रमण विभाग (Thane Anti-Encroachment) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'क्रिम पोस्टिंग' मानल्या जाणाऱ्या या उपायुक्त पदासाठी तब्बल ६ ते ७ कोटी रुपयांची बोली लागल्याची खळबळजनक चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पाटोळेंना कोणाच्या वरदहस्ताने या पदावर बसवण्यात आले? आणि कारवाईसाठी एका आमदाराने बिल्डरला ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा सल्ला का दिला? असे गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. ठाण्यातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अनेक अधिकारी या पदासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत.