#SindhudurgTragedy | #SeaAccident | #MaharashtraNews सिंधुदुर्गमधील शिरोडा-वेळागर समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या 8 पर्यटकांपैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर एका पर्यटकाची प्रकृती गंभीर आहे. पाचवा मृतदेहही शोध पथकांना मिळाला असून, उर्वरित दोन पर्यटकांचा शोध अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी आलेल्या या कुटुंबावर काळानं घाला घातला. या घटनेमुळे समुद्री सुरक्षेचा (Sea Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.