शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र **'सामना'**ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्यावर अग्रलेखातून जळजळीत टीका केली आहे. संघाला भारतात 'हिंदू मोहम्मद अली जिन्नांचे राज्य' हवे आहे, असा खळबळजनक आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. 'भारताचा 'हिंदू पाकिस्तान' करणे हे त्यांचे ध्येय आहे, असे सामनात म्हटले आहे. या अग्रलेखावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.