मराठा आरक्षण जीआर (Maratha Reservation GR) बाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा जीआरवर समाधान व्यक्त केले असून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.