न्यायव्यवस्थेला मोठा धक्का! सातारा येथील जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघरचे जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांना सेवेतून बडतर्फ (Dismissed) करण्यात आले आहे. जामीन देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप निकम यांच्यावर होता. तर शेख यांच्यावर ड्रग्ज तस्करी आणि कॉर्डिलिया क्रूझ पार्टीतील उपस्थितीचे गंभीर आरोप होते. उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.