कुख्यात गुंड निलेश घायवाळ (Nilesh Ghaiwal) याच्या अडचणी वाढल्या आहेत. खोटे कागदपत्रे आणि नावात फेरफार करून त्याने 'तात्काळ' पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. तसेच, पासपोर्टवर दिलेला पत्ताही बनावट असल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला (Passport Office) याबाबत पत्रव्यवहार केला आहे. हे सिद्ध झाल्यास निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता असून, त्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.