शिवसेना शिंदे गटाचे उद्या, ५ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन (Show of Strength) होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हॉटेल डेक्कन प्लाझा येथे सायंकाळी ७ वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. नाशिकमध्ये भाजपकडून (BJP) 'शंभर प्लस' चा नारा दिला जात असताना, शिंदे गट त्यांना स्वतंत्र आव्हान देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकांपूर्वी शिवसेना ॲक्शन मोडवर आल्याने नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.