मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोध कायम असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत, तर ओबीसी नेते बबनराव तायवाडे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.