पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावाने असलेल्या कारने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात विठ्ठल मरगळे नावाचे रिक्षाचालक जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली आहे. दरम्यान, वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.