#ManoramaKhedkar | #RabaaleKidnapping | #PoliceSearch रबाळे अपहरण प्रकरणात ३० सप्टेंबर रोजी मनोरमा खेडकरला अंतरिम जामीन मिळाला असला तरी, तिने जामीन अर्जात "कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही" असे सांगून चतुश्रुंगी पोलीस ठाण्यातील गुन्हा लपवला. खेडकर सध्या फरार असून, पुणे आणि नवी मुंबई पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. १४ सप्टेंबर रोजी पुण्यात पोलिसांनी छापा टाकला असता, खेडकरने त्यांना अडथळा आणला होता आणि या प्रकरणात ती मुख्य आरोपी आहे. आता पोलिसांनी तिच्या जामीन अर्जातील पत्त्यावर पुन्हा नोटीस लावली आहे.