मुंबईतील गोरेगाव परिसरात आरे मेट्रो स्थानकाखाली एका बसला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून त्याचा परिणाम थेट वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर झाला आहे. आधीच वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर आज नेहमीपेक्षा दुप्पट वेळ प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालीय.