मध्य रेल्वेवर दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सीएसएमटीहून सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी सुटलेल्या डोंबिवली लोकलच्या छतावर एक अज्ञात व्यक्ती चढल्याने खळबळ उडाली.. विक्रोळी स्थानकाजवळ ही घटना घडली.. या प्रकाराची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांची धावपळ सुरू झाली.. अखेर स्थानकात ट्रेन बराच वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.