बीडच्या परळीतील एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीये.. तुलसी कमळू असे या तरुणीचे नाव असून ती एका खासगी जीम मध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती.. शहरातील इंदिरानगर परिसरात कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना तिने गळफास घेत जीवन संपवले.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय..