राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या विद्यार्थींनीना कमवा आणि शिकाच्या धर्तीवर महिन्याला दोन हजार रुपये देण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. मुलींना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा दृष्टीकोनातून हा पॉकेटमनी देण्याचा विचार आहे. अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राज्यातील जवळपास 12 लाख उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ घेता येईल. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतल्या काही महाविद्यालयातील विद्यार्थी त्यासोबतच शिक्षकांशी मंत्रालयात संवाद साधला. त्यानंतर ते बोलत होते..विद्यार्थीनींना 2 हजार रुपये भत्ता देण्याच्या निर्णयावर मंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय..पाहुयात..