Mumbai| RTO अधिकाऱ्यांकडून कारवाईचा धडाका, 3,995 रिक्षा-टॅक्सी चालकांची तपासणी, 604 चालकांना नोटीस

मुंबईत आज मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झालीय.. आरटीओने शहरात केलेल्या कारवायांची माहिती आता समोर आलीय.. आजच्या कारवाईत तब्बल 3 हजार 995 वाहन चालकांची तपासणी केली. यापैकी 604 चालकांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसल्याचं निदर्शनास आलं. आरटीओ अधिकाऱ्यांनी यांना एक महिन्याची नोटीस बजावलीय. तर राज्यभरात 4 हजार 222 चालकांची तपासणी झाली. आणि 664 चालकांना नोटीस बजावण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ