मुंबई उपनगरी रेल्वेत धक्कादायक घटना घडलीय.. चर्चगेट-बोरिवली लोकलच्या दिव्यांग डब्यात बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला.. या वादातून एका दिव्यांग प्रवाशाला धक्का देण्यात आला.. केजितन पाल डेनिस पिरिस या 62 वर्षीय प्रवाशाला ढकलल्याचा आरोप आहे.. खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला... त्यांचा भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.. या प्रकरणी आरोपी अमजद सफरीद्दीन शेख याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला... दरम्यान, आरोपी हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय.. तर कावळ्याला हाकलत असताना त्याचा धक्का लागल्याचा बनाव त्याने रचलाय..