स्वातंत्र्यदिनानंतर देशाच्या राजकारणात आता ‘वंदे मातरम’वरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या गायनाला कथितपणे विरोध झाल्याचा आरोप करत भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘स्वातंत्र्य चळवळीवर मक्तेदारी दाखवणे थांबवा’, असा टोला लगावत भाजपने काँग्रेसकडे सार्वजनिक माफीची मागितलीय. तर दुसरीकडे काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून भाजप राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार केला आहे. पाहूया हा संपूर्ण वाद काय आहे तो...